MOM परीक्षेचे शुल्क, प्रमाणपत्र + भेट व पुढील दिशा :-
• परीक्षेसाठी प्रती विद्यार्थी रु. ६०/- एवढे माफक शुल्क आकारण्यात येईल.
• परीक्षेस बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला ERA मधून मिळणारे MKCL चे ई-प्रमाणपत्र ALC तर्फे छापून देण्यात येईल. तसेच अशा प्रत्येक विद्यार्थ्याला MKCL कडून आकर्षक अशी वाचनभेट देण्यात येईल.
• ही वाचन भेट दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ शाळेत घेऊन जावी.
• या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची शाळेच्या पहिल्या सत्रांत परीक्षेचीही उत्तम तयारी होईल.
• तसेच दुसऱ्या सत्राच्या अभ्यासाच्या तयारीसाठी व त्या सत्राच्या अखेर मार्चच्या सुरुवातीस होणाऱ्या MOM परीक्षेच्या दुसऱ्या फेरीच्या तयारीसाठी MKCL eSchool सेवेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.

MOM पारितोषिके
• जिल्हा विजेत्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील:


जिल्हा पातळीवरील पारितोषिके
तपशील संख्या
इयत्ता ५ (५वी ते ९वी)
जिल्हे ३६
जिल्हावार व इयत्तावार विजेते
एकूण विजेते आणि पारितोषिके ५४०

• जिल्हा पातळीवरील विजेत्यांना MKCL eSchool च्या दुसऱ्या सत्राची पूर्ण फी (रु. १९००/- ५वी ते ७वी करिता व रु. २१५०/- ८वी ते ९वी करिता) गिफ्ट कूपन्स स्वरुपात दिली जाईल.
• राज्य पातळीवर खालीलप्रमाणे विजेते घोषित केले जातील:


राज्य पातळीवरील पारितोषिके
तपशील संख्या
इयत्ता ५ (५वी ते ९वी)
इयत्तावार विजेते
एकूण विजेते आणि पारितोषिके १५
 • राज्य पातळीवरील विजेत्यांना MKCL eSchool च्या दुसऱ्या सत्राची पूर्ण फी (रु. १९००/- ५वी ते ७वी करिता व रु. २१५०/- ८वी ते ९वी करिता) तसेच KLiC ENGLISH कोर्सची पूर्ण फी (रु. ४३००/- MMRDA रिजन करिता व रु. ३८००/- उर्वरित महाराष्ट्र करिता)गिफ्ट कूपन्स स्वरुपात दिली जाईल.
 • राज्यपातळीवर विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे जिल्हा पातळीवर पुन्हा विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच जिल्हा स्तरीय विजेत्यांची नावे राज्य पातळीवर परत घेतली जाणार नाहीत.
 • एक विद्यार्थी फक्त एका पारितोषिकासाठी पात्र ठरेल.
 • विजेत्यांना ही कूपन्स त्यांनी स्पर्धेसाठी नोंदविलेल्या मोबाईलवर डिजिटल स्वरुपात पाठविली जातील.
 • ही कूपन्स २० नोव्हेंबर २०१८ पर्यंत वैध राहतील.
 • विशेष प्राविण्य मिळविलेल्या विजेत्यांसाठी पारीतोषिकांबरोबरच राज्य पातळीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत मार्गदर्शन शिबिरेही आयोजित करण्यात येतील. याविषयीचा तपशील योग्य वेळी जाहीर करण्यात येईल.
 • MOM परीक्षेच्या निकालांची व पारितोषिक विजेत्यांच्या नावांची घोषणा: www.mkcl.org/mom या वेबसाईटवर

  १ नोव्हेंबर २०१८ रोजी जाहीर करण्यात येतील.


  विजेते निवडण्याचे निकष :
 • राज्य व जिल्हा स्तरीय विजेत्यांची निवड त्यांनी मिळवलेले गुण, सोडवलेले प्रश्न, विषयावार सोडवलेले बरोबर प्रश्न, काठीन्यता पातळीनुसार सोडवलेले प्रश्न, उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे कमीत कमी गुण या सर्व निकषांच्या आधारावर होईल.
 • या सर्व पातळींवर समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने होईल.