• MOM परीक्षेचे स्वरूप:
 • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
 • परीक्षा MS-CIT/KLiC ALC मध्ये, MKCL ERA प्रणालीमधून वेब कॅमेऱ्यासमोर व नियोजित तारखांनाच होईल.
 • परीक्षा सुरु होण्यापूर्वी लॉगीन केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला MKCL eSchool सेवेविषयी चित्रफितीच्या सहाय्याने सविस्तर माहिती दिली जाईल.व प्रवेश घेण्याचे आवाहन केले जाईल. त्यानंतर परीक्षा सुरू होईल.
 • प्रत्येक इयत्तेसाठी सर्व विषयांचा मिळून एकच पेपर असेल.
 • प्रश्नांना त्यांच्या त्यांच्या काठिण्य पातळीनुसार भिन्न गुण असतील.
 • सर्व विषयांचा प्रत्येकी एक प्रश्न असे प्रश्न-गट असतील. उदा. इयत्ता ५ वी ला ७ प्रश्नांचा एक प्रश्न-गट असेल कारण अभ्यासक्रमाच्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे इयत्ता ५ वी ला MOM परीक्षा विषयांची संख्या ७ आहे.
 • परीक्षेत पहिला प्रश्न-गट सोडवून झाला की सर्व विषयांच्या प्रत्येकी एक प्रश्नाचा दुसरा प्रश्न-गट विद्यार्थ्याला समोर दिसू लागेल. सलग दोन तास असे प्रश्न-गट एकापाठोपाठ विद्यार्थ्यासमोर येत राहतील.
 • एका प्रश्न-गटातील काही प्रश्नांची उत्तरे येत नसल्यास विद्यार्थी ते प्रश्न अनुत्तरीत ठेवून पुढे जाऊ शकतो व नंतर उत्तर सुचल्यास मागे जाऊन ते सोडवू शकतो. दोन तासांच्या परीक्षा कालावधीत त्या विशिष्ट प्रश्नांचे उत्तर अजिबात न सुचल्यास तो प्रश्न सोडून देऊ शकतो.
 • २ तासात प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला/तिला जमतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न-गट सोडवायचे आहेत. विद्यार्थी जसजसे प्रश्न-गट सोडवत पुढे जाईल तसतसे अजून अजून प्रश्न-गट त्याच्या समोर येत जातील व अधिकाधिक गुण मिळवण्याची संधी त्याला मिळत राहील. दोन तास संपले की पुढचे प्रश्न येण्याचे थांबेल व परीक्षा आपोआप संपेल. सर्वांसाठी समान व मर्यादित प्रश्नसंख्येची पारंपारिक प्रश्न-पत्रिका नसेल. त्यामुळे अधिकाधिक प्रश्न अचूक सोडवून ऑलिम्पिकसारखे नवनवे उच्चांक प्रस्थापित करायला गुणी विद्यार्थ्यांना भरपूर वाव असेल.
 • MOM परीक्षेतील प्रश्न-प्रकार:
 • एकच पर्याय बरोबर असलेले बहु-पर्यायी प्रश्न, अनेक पर्याय बरोबर असलेले बहु-पर्यायी प्रश्न, जोड्या लावा, अनेक स्तम्भांमधील पर्याय वर-खाली सरकवून सुसंगत पर्याय एकेका ओळीत आणून दाखवा, गाळलेल्या जागा भरा, प्रतिमा, चित्रे, ध्वनिफिती किंवा चित्रफितींवर आधारित प्रश्न, आकलन, वर्गीकरण, पर्यायांची निवड करून योग्य क्रम लावणे, शब्द कोडी, चित्र कोडी, इ.