MOM परीक्षेचा अभ्यासक्रम:

  • SSC बोर्ड, मराठी व सेमी इंग्रजी माध्यम, इयत्ता ५ वी ते ९ वी च्या सर्व विषयांच्या दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम व
  • व्यक्तीमत्व विकास: वरील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) इत्यादींवर आधारित प्रश्न. यासाठी कोणतीही पाठ्यपुस्तके व इतर पुस्तके वाचणे अपेक्षित नाही
  • इयत्तेनुसार MOM परीक्षेतील विषयांची संख्या व नावे:


इयत्ता विषय संख्या विषयांची नावे
५ वी मराठी, इंग्रजी, हिंदी, परिसर अभ्यास १, परिसर अभ्यास २, गणित, व्यक्तीमत्व विकास
६ वी मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास व नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, व्यक्तीमत्व विकास
७ वी मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास व नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, व्यक्तीमत्व विकास
८ वी मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, इतिहास व नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, व्यक्तीमत्व विकास
९ वी मराठी, इंग्रजी, हिंदी/संस्कृत, इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित भाग -१, गणित भाग – २, व्यक्तीमत्व विकास
MOM परीक्षेसाठी इयत्ता ८ वी आणि ९ वी या इयत्तांसाठी फक्त संपूर्ण हिंदी किंवा संपूर्ण संस्कृत (१०० गुण) हे गृहीत धरले जाणार आहे. त्यानुसार MOM स्पर्धेसाठी अर्ज करावा.